Pune Road Rage Horror: पुण्यातील पाषाण येथे एका जोडप्याला अडवून त्रास दिल्याची घटना समोर आली आहे. 18 एप्रिलला रात्री उशिरा ही घटना घडली. जेवणानंतर जोडपे घरी जाताना गुंडांच्या टोळीने त्यांची कार अडवली (Pune Road Rage). घटनेनंतर पतीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे तर पत्नी गंभीर जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केतकी भुजबळ आणि तिचे पती अमलदेव पीव्हीके रमन रात्री 11 वाजताच्या सुमारास मुकुंद नगरहून परत येत असताना त्यांच्या चाकचाकीची मद्यधूंद स्कूटर चालकाकडून वारंवार अडवून व्हायची. त्यामुळे अमल यांनी त्याला बाजूला करण्यासाठी अनेकदा हॉर्न वाजवले. या किरकोळ घटनेमुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

पुण्यातील पाषाण येथे रोडरेजची घटना

हॉर्न वाजवल्याच्या रागात मद्यधूंद स्कूटरस्वारांनी त्यांची गाडी लांबपर्यंत अडवली. काहीवेळीने ते थांबले आणि काय समस्या आहे ही विचारणा केली. तेव्हा आक्रमक झालेल्या व्यक्तीने पतीवर हल्ला केला, असे केतकी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरील पोस्टवर लिहिले. या घटनेत जोडप्याला मारहण झाली आहे. तर, कारच्या खिडक्या मोठ्या दगडांनी आणि हेडलाइट्स फोडल्या आहेत. सुदैवाने अमलदेव यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि गाडी तेथून पळवली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)