Resolution To Rename Mumbai Train Stations: विधानसभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे यांनी मुंबई शहरातील उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची केंद्र शासनास शिफारस करणारा ठराव मांडला. हा ठराव सभागृहात संमत करण्यात आला. ठरावानुसार मुंबई शहरातील मध्य रेल्वे मार्गावरील ‘करी रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘लालबाग’ रेल्वे स्थानक, ‘सॅंडहर्स्ट रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘डोंगरी’ रेल्वे स्थानक, पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘मरीन लाईन्स’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘मुंबादेवी’ रेल्वे स्थानक, ‘चर्नी रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘गिरगाव’ रेल्वे स्थानक, हार्बर रेल्वे मार्गावरील ‘कॉटन ग्रीन’ चे ‘काळा चौकी’ रेल्वे स्थानक, ‘डॉकयार्ड रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘माझगाव’ रेल्वे स्थानक, ‘किंग्ज सर्कल’ स्थानकाचे नाव ‘तीर्थंकर पार्श्वनाथ’ रेल्वे स्थानक करण्याबाबत केंद्र शासनास शिफारस करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव विधानसभेत संमत करण्यात आला. (हेही वाचा: Uday Samant On Fake Pathology Labs: राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅबवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा आणला जाणार; उदय सामंत यांचे आश्वासन)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)