Uday Samant On Fake Pathology Labs: राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅब (Fake Pathology Labs) वर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणला जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज विधानसभेत दिली. सुनील राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. या स्वतंत्र कायद्यात दरावर नियंत्रण, कलेक्शन सेंटर नोंदणी, फौजदारी कारवाई या संबंधी देखील तरतूद असेल. कायदा आणण्यासाठी विलंब झाला तर सध्याच्या नर्सिंग कायद्यात सुधारणा करून कारवाई केली जाईल, असंही मंत्री सामंत म्हणाले.
राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅबवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणला जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री @samant_uday यांनी विधानसभेत दिली.#MonsoonSession2024 #VidhanSabha pic.twitter.com/UoiO6UZZxS
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)