सध्या राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. रस्त्या-रस्त्यावर गणपती मंडळे स्थापन आहेत. अशात या काळात काही अनुचित घटनाही समोर येतात. आता पुण्यातील साने गुरुजी तरुण मित्र मंडळाला मंगळवारी भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सोशल मिडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मंडळाच्या कळसावरून आगीचे लोळ उठत आहेत. ही आग नक्की कशी लागली याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. मुसळधार पावसाने आग काही मिनिटांतच विझल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. साने गुरुजी तरुण गणपती मंडळाने यंदा महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. (हेही वाचा: Lalbaugcha Raja 2023: लालबागचा राजाची विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी उद्या चरणस्पर्शाची रांग सकाळी 6 वाजता व मुखदर्शनाची रांग रात्री 12 वाजता बंद होणार)
#WATCH | Pune, Maharashtra: Sane Guruji Tarun Mitra Mandal catches fire.
Details awaited. pic.twitter.com/N27zSpLi7Q
— ANI (@ANI) September 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)