लालबागचा राजा हे महाराष्ट्रासह देशातील तमाम भक्तांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लोखोंच्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. लालबागच्या राजाच्या विसर्जनाची मिरवणूक हे देखील एक मोठे आकर्षण असते. आता गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाची सांगता होणार आहेत. अशात उद्यापासून लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरु होत आहे. त्यामुळे या तयारीसाठी बुधवार दि. 27-09-2023 रोजी चरणस्पर्शाची रांग सकाळी 6:00 वाजता व मुखदर्शनाची रांग रात्री 12:00 वाजता बंद करण्यात येईल. लालबागचा राजा मंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा: Navi Mumbai News: तुर्भेत गणपती विसर्जनात दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल)
लालबागचा राजा 2023
लालबागचा राजाची विसर्जन मिरवणुकीची तयारी करण्याकरीता बुधवार दि. 27-09-2023 रोजी चरणस्पर्शाची रांग सकाळी 6:00 वाजता व मुखदर्शनाची रांग रात्री 12:00 वाजता बंद करण्यात येईल.#lalbaugcharaja pic.twitter.com/Pp92KDyU1Q
— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) September 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)