बुधवारी प्रसिद्ध झालेल्या संपत्ती अहवालानुसार (Wealth Report), मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये 6.40% किमत वाढ झाली आहे आणि जगभरातील प्राइम इंटरनॅशनल रेसिडेन्शियल इंडेक्समध्ये (Prime International Residential Index) शहर 37 व्या स्थानावर आहे. यंदा म्हणजेच 2023 मध्ये मुंबईतील प्रमुख मालमत्तांमध्ये 3% ची वाढ अपेक्षित आहे. साथीच्या आजारानंतर मुंबई आणि भारतातील इतर महानगरांमध्ये प्रमुख आणि मोठ्या निवासी जागांच्या मागणीत वाढ झाली आहे. टोकियोनंतर आशिया-पॅसिफिक बाजारपेठांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.

बेंगळुरूच्या मुख्य मालमत्तेच्या 3% ने वाढीमुळे शहराचे स्थान 2021 मधील 91 वरून 2022 मध्ये 63 व्या स्थानावर पोहोचले. तर, दिल्लीच्या मुख्य मालमत्ता बाजाराचे मूल्य 1.20% ने वाढले, ज्यामुळे ते 2021 मध्ये 93 व्या क्रमांकावरून 77 व्या क्रमांकावर गेले. या यादीमध्ये दुबईने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. दुबईमधील मुख्य निवासी किमती 44.20% ने वाढल्या. मुंबईने लंडन, न्यू यॉर्क, शांघाय, बर्लिन अशा मोठ-मोठ्या शहरांना मागे टाकले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)