महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या दृष्टीने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे नेतेमंडळी एकमेकांवर ताशेरे ओढत आहेत. विविध नेत्यांचे राजकारण डायलॉग गाजत आहेत. अशात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये त्यावर चांगलीच टीका केली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेला संबोधित करताना दिसत आहेत. यावेळी ते ज्येष्ठ नेते तानाजी सावंत यांनी केलेली कामे व राबवलेल्या योजनांची गणती करत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांना या योजना माहीतच नसल्याचे दिसत आहे. मागून तानाजी सावंत एक-एक करत या योजना त्यांना सांगत आहेत, व सीएम शिंदे ही नावे जनतेला सांगत आहेत.
आता यावर एका सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे म्हणाले, ‘टेलिप्रॉम्प्टर बिघडला असेल तर आमच्या मिंध्याचा टेलिप्रॉम्प्टर घेऊन जा. मिंध्याचा टेलिप्रॉम्प्टर कोण? तर बाजूला उभा असलेला धरण फोडणारा खेकडा. तो पाठीमागून सांगतोय आणि मिंधे बोलतोय.’ (हेही वाचा: Uddhav Thackeray: यवतमाळमध्ये हेलिपॅडवर सुरक्षा अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी, सुनावले खडेबोल)
राजकारण डायलॉग:
एकनाथ शिंदे-तानाजी सावंत यांचा 'तो' व्हिडीओ, उद्धव ठाकरेंचे जोरदार शालजोडे, नेमकं काय बोलले? pic.twitter.com/vAugMxD9Xd
— Mumbai Tak (@mumbaitak) November 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                             
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
