Liquor Served Openly at BJP Event: कर्नाटकातील चिक्कबल्लापूर (Chikkaballapur) जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी युनिटचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अहवालानुसार, माजी आरोग्यमंत्री के सुधाकर चिक्कबल्लापूरमधून खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी भाजपच्या नेलमंगला युनिटने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शेकडो लोकांना दारूचे वाटप करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये लोक रांगेत उभे राहून दारूच्या बाटल्या घेताना दिसत आहेत.

याबाबत बेंगळुरू ग्रामीणचे एसपी सीके बाबा म्हणतात, ‘याला अबकारी विभागाने परवानगी दिली होती आणि पोलिसांना बंदोबस्ताची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामध्ये पोलीस विभागाचा कोणताही दोष नाही, अशा कार्यक्रमाला परवानगी द्यायची की नाही हे ठरवण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची आहे.’ व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या कार्यक्रमात शेकडो लोकांना बिअर आणि व्हिस्कीच्या बाटल्या दिल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे. नेलमंगलाजवळील बाविकेरे गावात माजी मंत्री आणि जेडी(एस) नेते एचडी रेवन्ना यांच्या शेतजमिनीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. (हेही वाचा: Rahul Gandhi: हाथरस दुर्घटना पीडितांच्या कुटुंबाच्या आर्थित मदतीत वाढ करा, राहुल गांधी यांचे योगी आदित्यनाथ यांना पत्र)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)