शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी मिलिंद नार्वेकर यांच्या बॅगेची सुरक्षा अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. वृत्तानुसार, ठाकरे सोमवारी महाराष्ट्रातील यवतमाळ येथील हेलिपॅडवर उतरताना त्यांची बॅग तपासली गेली. यावेळी त्यांनी बॅग तपासत असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला. ठाकरे यांनी वणी येथील हेलिपॅडवर सुरक्षा अधिकारी त्यांच्या बॅगा तपासत असल्याचा व्हिडिओ बनवून तो शेअर केला आहे. यावेळी, ‘तुम्ही इतर कोणत्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासल्या आहेत का?’ असा सवाल ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केला.

ते पुढे म्हणतात, ‘तुम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मोदी आणि अमित शहा यांच्या बॅगा तपासल्या आहेत का?’ यावर अधिकाऱ्यांनी नाही असे उत्त दिल्यावर, ‘तुम्ही मोदींच्या बॅगा तपासत असल्याचा व्हिडिओ मला पाहायला मिळाला पाहिजे’, असे ठाकरे अधिकाऱ्यांना सांगतात. या घटनेनंतर एका सभेत ठाकरे म्हणाले की, ‘मला व्यवस्थेवर राग नाही. ते त्यांचे काम करत आहेत, मी माझे करतो. पण मला विचारायचे आहे की त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या बॅगा तपासल्या आहेत की नाही? एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासावी की नाही?’ (हेही वाचा: Riteish Deshmukh Latur Speech: धीरज देशमुख यांच्या प्रचारसभेत रितेश देशमुख चे 'सूरज चव्हाण' च्या अंदाजात राजकीय डायलॉग)

सुरक्षा अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)