फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलिसांनी मंगळवारी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध सुमारे 700 पानांचे आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह सुमारे 20 जणांच्या जबाबांचा समावेश करण्यात आला आहे.

एकनाथ खडसे यांचा फोन टॅप केल्याचा आरोप करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांच्या तक्रारीनंतर मार्च महिन्यात शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात भारतीय टेलिग्राफ कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते की, शुक्ला राज्य गुप्तचर विभागाचे (SID) प्रमुख असताना कथित बेकायदेशीर फोन टॅपिंग झाले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)