Pankaja Munde Seen Crying: लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे यांच्या काही समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी सोमवारी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पंकजा मुंडे यांना पाहताच कुटुंबीय रडू लागले. यावेळी पंकजा मुंडे यांनाही आपले अश्रू अनावर झाले. त्यादेखील रडू लागल्या. पंकजा मुंडे यांनी आज अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील स्व. पांडुरंग सोनवणे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यासह त्यांनी अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील सचिन मुंडे यांच्याही कुटुंबाची भेट घेऊन शोकभावना व्यक्त केल्या.
आतापर्यंत पाच मुंडे समर्थकांचा मृत्यू झाला आहे. पंकजा मुंडे सातत्याने लोकांना आत्महत्या न करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, एकामागून एक समर्थक आत्महत्या करत आहेत. हे पाहून त्यांचे मनही दु:खी झाले आहे. जीवनात हार मानू नका, असे पंकजा मुंडे यांनी सोशल मीडिया एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्या म्हणतात, ‘माझ्यासाठी माझा कार्यकर्ता महत्वाचा आहे. कृपा करून अशी पावल उचलू नका, आपल्या मुलाबाळांना, परिवाराला सोडून जाऊ नका.’ (हेही वाचा: Aaditya Thackeray On EVM: गद्दार उमेदवार आता लोकशाहीशी गद्दारी करत आहे; आदित्य ठाकरेंची टिका)
पहा व्हिडिओ-
#WATCH | Maharashtra: BJP candidate from Beed, Pankaja Munde was seen crying as she visited the houses of one of her four supporters who died by suicide after she lost the elections from the constituency. pic.twitter.com/BJ13tiCraB
— ANI (@ANI) June 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)