बुधवारी, महाराष्ट्र सीजीएसटी (CGST) पालघर आयुक्तालयाने बनावट बिले आणि जीएसटी (GST) इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणूक प्रकरणी मोठी कारवाई केली. आयुक्तालयाने यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की सीजीएसटी पालघरने 1000 कोटींहून अधिकची बोगस बिले आणि 181 कोटी रुपयांची जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) फसवणूक केल्याबद्दल एका अकाउंटंटला अटक केली आहे. आयटीसी फसवणुकीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून सीजीएसटीकडून अटक करण्यात येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)