काल नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सांगितले की, राष्ट्रवादीचा कोणताही नेता त्यांच्या पक्षाच्या संपर्कात नाही. मात्र, ज्याला पक्षात यायचे असेल त्याचे भाजप स्वागत करेल.
ते म्हणाले, ‘जवळपास 25 वर्षांपासून पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात खळबळ उडण्याची शक्यता आहे. मात्र, एकाही नेत्याने आमच्याशी संपर्क साधला नाही, तसेच आमच्या बाजूनेही राष्ट्रवादीतील कोणाशीही संपर्क साधला गेला नाही. राष्ट्रवादीतील कोणीही आमच्या पक्षात सामील होण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.’ (हेही वाचा: नव्या एनसीपी अध्यक्ष साठी चर्चेत असलेल्या Praful Patel यांनी दिली त्यावर पहिल्यांदाच स्पष्ट प्रतिक्रिया; पहा काय म्हणाले)
आमच्या कार्यालयात पक्षप्रवेशासाठी कुणीही आलं तर आम्ही त्यांचा पक्षप्रवेश करूhttps://t.co/xF89nOWoU1 < येथे वाचा सविस्तर वृत्त#MaharashtraPolitics #ncp #political #chandrashekharbawankule @cbawankule @BJP4Maharashtra @NCPspeaks pic.twitter.com/WAiE6UyTnw
— LoksattaLive (@LoksattaLive) May 3, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)