केंद्र सरकारने गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळं पूर्वी झालेल्या नुकसानीपोटी राज्याच्या मागणीच्या काही अंशी (७०१ कोटी ₹) मदत केल्याबद्दल केंद्राचे आभार! पण नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत कोकण, प. महाराष्ट्र व विदर्भात शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून २०० हून अधिक लोकांचा बळी गेला व मोठ्या प्रमाणात पशुधनही वाहून गेलं. तसंच हजारो कुटुंबांचा संसार वाहून गेला. त्यांना उभं करण्यासाठी राज्य सरकार काम करतंय मात्र केंद्राचीही मदत आवश्यक आहे. तौक्ते चक्रीवादळात केंद्र सरकारने गुजरातला तातडीने १ हजार कोटी ₹ दिले,त्याच धर्तीवर महाराष्ट्रालाही मदत करावी, ही विनंती आणि ती मिळेल असा विश्वास आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)