राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांना टोला लगावला आले. शिवसेना स्थापना दिन नुकताच पार पडला. या वेळी आयोजित कार्यक्रमात कदम यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. या टीकेला अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, रामदास कदमजी आपण जोरात बोललात

"मागुन आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं" माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका.. (हेही वाचा, Shiv Sena Foundation Day 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना आव्हान, '...जाहिरनाम्यात जे सांगितले ते पूर्ण करा')

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)