नाशिकच्या सिटीलिंक शहर बससेवेत भाडेवाढ करण्यात आली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2023 च्या मध्यरात्रीपासून ही नवीन भाडेवाढ लागू होईल. हा निर्णय नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने घेण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार वाढणारे इंधन दर, परिणामी वाढणारा आर्थिक तोटा लक्षात घेता ही भाडेवाढ करण्यात आली आहे. आवश्यक सर्व सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर ही भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये वाढलेले इंधन दर बघता तसेच प्रवासी हिताचा विचार करता कोणतीही अतिरिक्त भाडेवाढ न करता केवळ नियमांनुसार भाडेवाढ करण्यात आलेली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)