Viral Video: मुंबईतील वांद्रा बॅंडस्टॅडवरील गोल्डमॅनला हवालदारानी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्रीच्या वेळी पोलीस हवालदार नशेत असताना हे कृत्य केल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी गोल्डमॅनला काठीने मारहाण केल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी पीडित व्यक्तीला धक्काबुक्की केली हे पाहून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतला. स्थानिकांनी पीडित व्यक्तीला पोलीसांच्या मारहाणी पासून बचावले आहे. गोल्डमॅनने स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि सर्व घटनाची माहिती शेअर केली आहे. ही घटना काल रात्री झाल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)