मागील काही दिवसांत उकाड्याने मुंबईकर हैराण झाले होते. आता तापमानाच्या बाबतील त्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. उन्हाच्या झळा कमी झाल्याने दिवसभरात काही प्रमाणात थंड हवा अनुभवायला मिळत आहे. आता आल्हाददायक रात्रीसोबतच उद्याची सकाळदेखील थंड असेल. उद्या मुंबईकर मार्च 2025 सर्वात थंड सकाळ अनुभवतील. अनेक भागात तापमान 20°C पेक्षा कमी होऊ शकते, अंतर्गत एमएमइरमध्ये 17-19°C पर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे. अहवालानुसार, 22 मार्च रोजी मुंबई शहरात आकाश स्पष्टपणे निरभ्र राहील. (हेही वाचा: Maharashtra Weather Forecast: राज्यातील वाढत्या तापमानावर पावसाचा शिडकाव? गारपीटीसह पर्जन्यवृष्टीची शक्यता)
Mumbai Weather Update:
🚨 Along with pleasant night, Mumbai will wake up to its coolest morning of March 2025 tomorrow, temperatures may dip below 20°C in several areas, Interior MMR likely to see 17-19°C. 📉
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) March 21, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)