Weather Forecast | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिमग्याची होळी झाली, धुलीवंदनाला नाही म्हटलं तरी, हलकासा शिडकाव करत का होईना पाऊस येतो, अशी नागरिकांची धारणा. यंदा किंवा अलिकडील काही वर्षांमध्ये अपवाद वगळता ती फारशी खरी ठरली नाही. उलट डोक्यावरचा सूर्य आग ओकताना पाहायला मिळतो आहे. परिणामी राज्यात प्रचंड प्रमाणात उन्हाचा कडाका (Maharashtra Temperatures) आणि काहीली वाढली आहे. उकाड्याने अंगाला घामाच्या धारा लागत आहे. असे असले तरी, पुढचे चार दिवस वातावरणात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार पाऊस (Weather Forecast Maharashtra) बरसण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी तर गारपीटी शक्यता सुद्धा असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्वला आहे.

शहरात उकाडा, ग्रामीण महाराष्ट्रात उन्हाचा चटका

राज्यातील तापमानाची सध्यास्थिती पाहता पारा 40 अंशाच्या पार गेला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं मुश्कील होऊन बसलं आहे. शहरांमध्ये उकाड्याने नागरिकांच्या जीवाची काहीली होत आहे. घरातील तापमान नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या विद्युत उपकरणांच्या वापरामुळे विजेची मागणी वाढली आहे. दुसऱ्या बाजूला गावखेड्यांमध्ये म्हणजेच ग्रामीण महाराष्ट्रात शेताची कामे दुपारच्या वेळी करणे मोठे आव्हान होऊन बसले आहे. आगोदरच करावा लागणारा पाणीटंचाईचा सामना. त्यात वाढते ऊन. त्यामुळे दुपारच्या वेळी शेताची कामे करायची तरी कशी, असा सवाल शेतकरी आणि मजुरांसमोर उभा ठाकला आहे.

राज्यातील तापमानाच्या ठळक नोंदी

  • राज्यातील विविध विभागांमध्ये तापमानात मोठी वाढ.
  • विदर्भात तापमान वाढीचा वेग सर्वाधिक.
  • आजपासून (19 मार्च) उष्णतेचा कडाका कमी होण्याची शक्यता.
  • मुसळधार पावसाची अचानक हजेरी पाहायला मिळू शकते.
  • विदर्भ आणि मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता.

उष्णतेपासून दिलासा?

राज्यात पडू शकणाऱ्या संभाव्य पावसामुळे काही प्रमाणात का होईना नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकणार आहे. हा दिलासा किती मिळणार हे पडणाऱ्या पावसावर आणि हवेत राहणाऱ्या आर्द्रतेवर अवलंबून असणार आहे. राज्यातील तापमानाची सध्यास्थिती पाहता नागरिक पावसाची आणि उकाडा कमी होण्याची अतूरतेने वाट पाहात आहे. (हेही वाचा, 8th Pay Commission: आठवा वेतन आयोग, वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ अपेक्षित; एप्रिल 2025 पर्यंत ToR अंतिम होण्याची शक्यता)

दरम्यान, यंदा उष्णता वाढ नेहमीपेक्षा काहीशी लवकरच पाहायला मिळत आहे. दरवर्शी साधारणपणे होळीनंतर उष्णता वाढू लागते. पण यंदा होळीच्या कितीतरी दिवस आगोदरच उष्णता वाढू लागण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची तर शहरांमध्ये विजेची गरज अधिक भासू लागली आहे. संभाव्य पावसाने त्यात थोडी शिथीलता येण्याची शक्यता आहे.