मुंबईमध्ये महापालिकेने 1 जुलै पासून 10 टक्के पाणीकपात लागू केली होती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा कमी झाल्याने ही पाणी कपात लागू होती. मात्र आता गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सात तलावांमधील पाणीसाठा त्यांच्या एकूण क्षमतेच्या 80% इतका वाढला आहे. सध्याचा पाणीसाठा मे 2024 पर्यंत पुरेसा आहे. त्यामुळे, मुंबईकरांवर लागू करण्यात आलेली 10% पाणीकपात बीएमसी लवकरच मागे घेणार आहे. माहितीनुसार, उद्या म्हणजेच 9 ऑगस्ट 2023 पासून ही पाणीकपात मागे घेतली जाणार आहे.

(हेही वाचा: Pune Water Supply News: पुण्यात गुरुवारचा ‘पाणी बंद’चा निर्णय अखेर मागे, नागरिकांना दिलासा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)