मुंबई मध्ये दोन दिवसांपूर्वी Pise Water Pumping Station मध्ये आग लागल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. आता या ट्रान्सफॉर्मरच्या दुरूस्तीला वेळ लागणार असल्याने 5 मार्च पर्यंत मुंबईत सर्व विभागांत 15% पाणीकपातीचा निर्णय झाला आहे. 2 ट्रान्सफार्मर व त्याआधारे 15 पंप कार्यांवित करण्यात पालिकेला यश आले आहे पण तिसरा ट्रान्सफार्मर कार्यान्वित होण्यासाठी 5 मार्च पर्यंतचा वेळ लागणार असल्याने मुंबई मध्ये पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले. Mumbai Water Cut Update: मुंबईकरांवर पाणी कपातीच्या संकटाची टांगती तलवार; जलसाठा मागील 3 वर्षांतील निच्चांकी स्तरावर .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)