लोकसभेच्या महाराष्ट्रासाठी शेवटच्या मतदान टप्प्यापूर्वी 15 मे दिवशी मुंबई मध्ये पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. 15 मे ला दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत एलबीएस मार्गावर घाटकोपर वाहतूक विभागाच्या हद्दीत रोड शो असल्याने गांधी नगर जंक्शन ते नौपाडा जंक्शन तसेच माहुल घाटकोपर रोड वर मेघराज जंक्शन ते आ बी जंक्शन वरीक्क वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Lok Sabha Elections 2024: 'मी माझ्या वडिलांच्या नावावर मते मागत आहे, तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावावर मते मागावीत'; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदी आणि भाजपला इशारा .
पहा 15 मे दिवशीचे मुंबईतील वाहतूकीमधील बदल
दि. १५ मे २०२४ रोजी लाल बहादूर शास्त्री मार्गावर रोड शो आयोजित केला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होणार आहेत.
येथील नजीकच्या मार्गांवर होणाऱ्या वाहनांच्या वर्दळीसाठी व गर्दीसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी. #MTPTrafficUpdates pic.twitter.com/GvEgGb0tnP
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)