खासदार सुप्रिया सुळे, एलजीबीटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया पाटील यांच्या विनंतीनुसार पुढाकार घेऊन राज्यात विक्रोळी (पश्चिम) येथे, सेंट जोसेफ शाळेमध्ये तृतीयपंथीयांसह एलजीबीटी नागरिकांसाठी राजेश टोपे यांच्या हस्ते विशेष कोविड-19 लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. तृतीयपंथी आणि एलजीबीटी नागरिकांचे कोव्हिड-19 लसीकरण पूर्ण करण्यासाठी हे केंद्र पुढील सहा महिने संचालित करण्यात येणार आहे. तृतीयपंथी नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नसले तरीही त्यांचे कोव्हिड-19 लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)