दक्षिण मुंबईची लोकसभा निवडणूकीमधील जागा एकनाथ शिंदे गट अखेर आपल्याकडे राखण्यात यशस्वी झाला आहे. शिवसेनेकडून मुंबई दक्षिण मतदारसंघातून यामिनी यशवंत जाधव यांचे नाव घोषित केले आहे. त्यांची लढाई आता शिवसेना ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांच्यासोबत होणार आहे. यामिनी जाधव या सध्या भायखळा विधानसभेच्या आमदार आहेत. मुंबई मधील लोकसभेचं मतदान आता अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपलं आहे. नक्की वाचा: Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून Ravindra Waikar यांना उमेदवारी .
पहा ट्वीट
लोकसभा निवडणूक - २०२४ साठी मुंबई दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. यामिनी यशवंत जाधव यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा !#Shivsena pic.twitter.com/t3FL7mjvlB
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) April 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)