मुंबई मध्ये आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. वारा आणि पाऊस असल्याने मालाड मध्ये एके ठिकाणी झाड उन्मळून पडल्याची दुर्घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुंबई मध्ये मागील 24 तासांत झाडं कोसळल्याच्या 26 घटना समोर आल्या आहेत. तर 15 ठिकाणी शॉर्ट सर्कीट आणि 5 ठिकाणी इमारतींचा भाग कोसळल्याचं समोर आलं आहे. Mumbai Rains: अंधेरी सब वे मध्ये साचलं दीड ते 2 फीट पाणी; रस्ते वाहतूकीच्या मार्गात बदल.
पहा ट्वीट
Man dies after tree falls amid heavy rains in Mumbaihttps://t.co/CkE7Ij9snm pic.twitter.com/5iKvD7TkW6
— Press Trust of India (@PTI_News) June 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)