मुंबई मध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वेसेवेला आज झाला आहे. मुंबई लोकल प्रमाणेच काही लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रखडल्या आहे. सर्वसामान्यांची त्यामुळे आज मोठी गैरसोय होत आहे. आज विदर्भ एक्सप्रेस ने येणार्‍या अमोल मिटकरी आणि अनिल पाटील यांनाही या पावसाचा फटका बसला आहे. मुंबई मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी येणार्‍या या दोघांना कुर्ला ते दादर दरम्यान ट्रेन रखडल्याने ट्रॅक वरून चालण्याची नामुष्की आली आहे. अनिल पाटील हे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मंत्री आहेत. Mumbai Pune Train Cancelled: जोरदार पावसाचा रेल्वे सेवेला फटका; पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या सिंहगड,डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द .

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)