Mumbai Pune Train Cancelled: मुंबई शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यातून नागरिक वाट काढून रस्ता शोधत आहेत. मध्य रेल्वेच्या पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.  मुंबईतील रेल्वे परिसरात पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांमध्ये ट्रेन क्र. 11009 सीएसएमटी - पुणे सिंहगड एक्स्प्रेस, ट्रेन क्र. 12123 सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, ट्रेन क्र. 11008 पुणे - सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, ट्रेन क्र. 12128 पुणे - सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेसचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, विक्रोळी आणि भांडूप रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. रात्री मुसळधार पाऊस असल्याने दादर परिसरात पाणी साचले आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. (हेही वाचा: Mumbai Heavy Rainfall: मुंबई शहरात आणि उपनगरात मुसळधार पाऊस, रेल्वे रुळावर पाणी साचले, जनजीवन विस्कळीत (Watch Video))

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)