BPCL Petrol Pump Accident In Ghatkopar: मुंबई मध्ये पहिल्याच मान्सून पूर्व पावसामध्ये दोन मोठ्या दुर्घटना झाल्या आहेत. घाटकोपर मध्ये रमाबाई नगर जवळ असलेल्या पेट्रोप पंप वर एक होर्डिंग कोसळलं आहे. पावसापासून आसरा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं तेथे आली त्यामुळे या लोखंडी होर्डिंगच्या खाली मोठ्या प्रमाणात लोकं अडकली आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून बचाव कार्य हाती घेण्यात आले असून जखमींची सुटका करत राजावाडी हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल केले आहे. पालिकेच्या माहितीनुसार, 7 जणांना बाहेर काढलं आहे. तर वडाळ्यातही बघता बघता पार्किंग टॉवर कोसळला आहे. याठिकाणी देखील अग्निशमन दल मदतीसाठी पोहचलं आहे. Badalapur Rain: बदलापुरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, रेल्वे सेवाही प्रभावित .
मुंबईत पहिल्याच वादळी पावसात दुर्घटना
Two major incidents in #Mumbai.#MumbaiRains pic.twitter.com/szPVx549PQ
— Vivek Gupta (@imvivekgupta) May 13, 2024
At least seven people got injured after an aluminum shade fell at the Police Ground Petrol Pump, Eastern Express Highway, Pantnagar, Ghatkopar East. Search and rescue is in process: BMC
— ANI (@ANI) May 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)