बदलापूर आणि वांगणी परिसरात जोरदार वादली वाऱ्यासह पावसाने हजेरी (Badlapur Unseasonal Rain) लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारंबळ उडाली. या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. त्याचसोबत रेल्वे प्रवाशांना देखील या पावसाचा फटका बसत आहे. सध्या बदलापूर आणि वांगणी परिसरात जोरदार वेगाने वारे वाहत आहेत. या पावसानंतर काही परिसरातील वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. यावेळी काही ठिकाणी गरपीट देखील झाली आहे. (हेही वाचा - Mumbai Rains: सांताक्रूझ परिसरात जोरदार पावसाची हजेरी; सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरूवात)
पाहा पोस्ट -
Dust Storm accompanied by Thunder and Rain hits Badlapur,Bhiwandi,Kalyan. Next hour it should hit Thane and Central Mumbai ⚠️
Visuals from Kalyan 📽️ #MumbaiRains pic.twitter.com/W5uOreyyG0
— Mumbai Nowcast (@MumbaiNowcast) May 13, 2024
बदलापूर आणि वांगणीत जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. उल्हासनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार वारा सुटला आहे. या पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारंबळ उडाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरूवात झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे घराकडे परतणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
पाहा पोस्ट -
OMG it’s heavenly 🧊🥶
Seeing ice falling from the sky. #MumbaiRains #Badlapur pic.twitter.com/RdypOegiWr
— Sonali (@_sonalik7) May 13, 2024
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी दुपारनंतर पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी दोननंतर आकाशात ढगांची गर्दी जमू लागली. अडीचनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला. तर संपूर्ण आकाशात काळोख पसरला होता. त्यामुळे पाऊस कोसळणार याची चाहूल लागली. तीनच्या सुमारास बदलापूर आणि आसपासच्या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही काळ गारांचाही पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ झाली.