मुंबईच्या (Mumbai) दर्याला आज उधाण येणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मरिन ड्राईव्ह (Marine Drive), गेट वे ऑफ इंडिया (Gateway Of India) या परिसरात उंच लाटा बघायला मिळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई, नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) या भागात ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच अधूनमधून तीव्र सरी पडण्याची शक्यत असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
२१ऑगस्ट २०२२
हवामान अंदाज :-.
कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर व उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. अधूनमधून तीव्र सरी पडण्याची शक्यता आहे.
भरती-
सायं :- ०६:३४वा .- २.७८ मी
ओहोटी:-
रात्री:- ०२:१७वा -०२.५६ मी
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)