Mumbai Mega Block: मध्य रेल्वे, मुंबई विभाग 1 सप्टेंबर 2024 रोजी विविध सीएसएमटी मुंबईहून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन स्लो मार्गावरील सेवा, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर त्या मुलुंड स्थानकावर डाऊन स्लो मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप स्लो मार्गावरील सेवा मुलुंड येथे, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येईल, पुढे त्या माटुंगा येथे अप स्लो मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. गाड्या नियोजित वेळेच्या 15 मिनिटांनी गंतव्यस्थानी पोहोचतील. ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल, जी सीएसएमटी मुंबईहून सकाळी 9.53 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल आसनगाव लोकल सीएसएमटी मुंबईहून दुपारी 3.32 वाजता सुटणार आहे. (हेही वाचा: Swargate Metro Station: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; गणेशोत्सवादरम्यान स्वारगेट मेट्रो स्टेशनचा 'श्रीगणेशा' होण्याची शक्यता, जाणून घ्या सविस्तर)

मध्य रेल्वे 1 सप्टेंबर रोजी घेणार मेगा ब्लॉक-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)