हार्बर रेल्वे लाईन वर वडाळा- मानखुर्द दरम्यान रखडलेली रेल्वेसेवा पूर्वपदावर आली असल्याची माहिती मध्य रेल्वे कडून देण्यात आली आहे. आज सकाळी 9.30 नंतर हार्बर रेल्वेवरील सेवा रखडली होती. मिठी नदीचं पाणी बाहेर आल्यानंतर चुनाभट्टी स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. ते आजूबाजूच्या परिसरासोबतच ट्रॅकवरही आलं होतं. आधी सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान सेवा सुरू झाली सीएसएमटी ते गोरेगाव देखील सेवा सुरू झाली होती पण वडाळा- मानखुर्द मधली सेवा रखडली होती ती आता पुन्हा झाली आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूक पूर्ववत
#CRupdates at 13.30 hrs.#MumbaiRains #HarbourlInes
Train Services on Down & Up Harbour line between Vadala & Mankhurd are resumed.
— Central Railway (@Central_Railway) July 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)