Mumbai Airport: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई विमानतळ 7 तास बंद राहणार आहे. अकासा एअरलाइन्सने यासंदर्भात पोस्ट जारी करत माहिती दिली आहे. एअरलाइन्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले की, मान्सूनपूर्व (Monsoon 2025) देखभालीमुळे मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या 8 मे 2025 रोजी बंद राहतील. यामुळे मुंबईहून ये-जा करणाऱ्या आमच्या काही विमान उड्डाणांवर परिणाम होणार आहे. तुमच्या प्रवासाच्या योजनेत यामुळे अडथळा येऊ शकतो. याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज 900 विमानांची वाहतूक होते. या देखभालीमुळे एअरसाइड पट्टी मजबूत करण्यास मदत होते.

मान्सूनपूर्व देखभालीच्या कामांमुळे 8 मे रोजी काही उड्डाणे रद्द

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)