मुंबई मध्ये आज सकाळपासून पुन्हा जोरदार सरी बरसण्यास सुरूवात झाली आहे. अधून मधून मध्यम ते अतिजोरदार सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या मुसळधारेमध्ये अनेकजण पावसाचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनारी जातात पण त्यामध्ये भरती- ओहोटीच्या वेळा टाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. आज मुंबई मध्ये सकाळी ओहोटी ०९:४२ वाजताआहे तर यावेळेस लाटांची उंची २.१० मीटर असण्याचा अंदाज आहे. तर भरती - सायंकाळी - ०४:३९ वाजता आहे आणि लाटांची उंची ३.६९ मीटर आहे. Mumbai Weather Forecast Today: मुसळधार पावसामुळे मुंबईत ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाने वर्तवला अंदाज .
मुंबई मधील पहा आजच्या भरती-ओहोटीच्या वेळा
🗓️ १३ जुलै २०२४
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल;तर काही ठिकाणी अती जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
ओहोटी -सकाळी - ०९:४२ वाजता - २.१० मीटर
🌊 भरती - सायंकाळी - ०४:३९ वाजता - ३.६९ मीटर
ओहोटी - रात्री - ११:०५ वाजता - १.६६ मीटर…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)