मुंबईमध्ये गणपती विसर्जन सोहळ्याच्या तयारीसाठी, पश्चिम रेल्वेने 28 आणि 29 सप्टेंबरच्या मध्यरात्री जादा लोकल गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. यासाठी एकूण आठ विशेष लोकल गाड्या सोडण्यात येतील. यातील चार चर्चगेट आणि चार विरारहून सुटतील. पश्चिम रेल्वेच्या मते, गणपती विसर्जन उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि कार्यक्षम वाहतूक अनुभव सुकर करण्याच्या उद्देशाने या गाड्या आहेत. (हेही वाचा: Ganeshotsav 2023: मुंबई येथे 'वंदे भारत' संकल्पनेवर गणेश देखावा)

चर्चगेट स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळा-

पहाटे- 1.15, 1:55, 2:25 आणि 3.20 वाजता

विरार स्टेशनवरून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळा-

रात्री 12.15, 12.45, 1.40, 3 वाजता

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)