मुंबई मध्ये भाडे नाकारणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. लांब पल्ल्यांच्या भाड्यासाठी अनेकदा नजिकची भाडी नाकारल्याने नागरिक त्रस्त असतात. त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी मुंबई ट्राफिक विभाग आता सज्ज झाला आहे. मुजोर रिक्षा, टॅक्सी चालकांविरूद्ध मो.वा.का. 178 (3),1988 अंतर्गत कारवाई होणार आहे. नक्की वाचा: मुंबई मध्ये टॅक्सी चालकाने भाडं नाकरालं तर थेट फोन वर मदतीला येणार Tardeo RTO ची स्पेशल टीम
पहा ट्वीट
भाडे नाकारणाऱ्या रिक्षा व टॅक्सी चालकांविरुद्ध मो.वा.का. १७८ (३) अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे आदेश प्रभारी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे.
याविषयी जनजागृती करण्याकरिता रेल्वे व बस स्थानकांबाहेर फलक लावण्यात आले आहेत.
(१/२) pic.twitter.com/oJ3ce1ALFy
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) October 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)