रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या वाहनांवर मुंबई पोलीस आता कारवाई करत आहेत. या मोहिमेला 'ऑपरेशन खटारा' असे नाव देण्यात आले आहे. त्याचे नेतृत्व स्वत: पोलीस आयुक्त संजय पांडे करत आहेत. याअंतर्गत रस्त्यांच्या कडेला बेवारस स्थितीत पार्क केलेली वाहने हटविण्यात येणार आहेत. यासोबतच बेकायदेशीरपणे वाहन पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांकडून दंड वसूल केला जाणार आहे.

आज संजय पांडे यांनी माहिती दिली आहे की, 'काल राँग साईड ड्रायव्हिंगच्या 85 केसेस झाल्या तर, 'ऑपरेशन खटारा' अंतर्गत 126 गाड्या काढल्या गेल्या. अजूनही बाईकर्स रेसमध्ये आहेत. परंतु लवकरच मुंबईच्या रस्त्यावर मुंबई पोलिसांकडून या बाइक्स बाहेर काढल्या जातील याची आम्ही खात्री करू.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)