Startup India Job Creation: एमएसएमई मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेत सांगितले की, देशात स्टार्टअप्सच्या माध्यमातून 8 लाख 40 हजारांहून अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. 84 हजार मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. राणे म्हणाले की, हे स्टार्टअप देशातील 640 जिल्ह्यांमध्ये चालवले जात आहेत. यापैकी 45 टक्के स्टार्टअप्स 2-स्तरीय आणि 3-स्तरीय शहरांमध्ये आहेत. मंत्र्यांनी माहिती दिली की 100 हून अधिक भारतीय स्टार्टअप्सना युनिकॉर्नचा दर्जा मिळाला आहे. स्टार्टअपच्या बाबतीत भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा - Maharashtra Govt Holiday List 2023: महाराष्ट्र शासनाकडून 2023 या वर्षासाठीच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; 'येथे' पहा यादी)
देश में स्टार्टअप्स के जरिये आठ लाख 40 हजार से अधिक रोजगार जुटाये गए हैं https://t.co/HDrznzn9A7
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) December 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)