Rs 1 Lakh Stipend For Skincare: जर तुम्हाला स्किनकेअर आवडत असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. लोकप्रिय स्किनकेअर ब्रँड Deconstruct ने एक अनोखा ‘स्किनकेअर इंटर्नशिप’ कार्यक्रम सुरू केला आहे. स्किनकेअर हा प्रत्येकासाठी प्रवेशयोग्य बनवण्याचा त्याचा उद्देश आहे. प्रभावी दिनचर्या आणि स्किनकेअर उत्पादने शोधताना मदत मिळावी यासाठी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. हा उपक्रम स्किनकेअरच्या जगात प्रवेश करू पाहणाऱ्या नवशिक्यांसाठी उत्तम बक्षीस मिळवण्याची संधी आहे. ही इंटर्नशिप 18 वर्षांवरील प्रत्येकासाठी खुली आहे. कंपनीने पुरुष सहभागींसाठी 50% स्पॉट्स राखीव ठेवले आहेत. स्किनकेअर केवळ महिलांसाठी आहे हा समज दूर करण्याचा उद्देश आहे. हा कार्यक्रम सर्व लिंग, वयोगट आणि पार्श्वभूमीतील सहभागींचे स्वागत करतो. निवडलेल्या सहभागींना त्यांच्या वैयक्तिक त्वचेच्या प्रकारांना अनुरूप स्किनकेअर उत्पादने दिली जातील. हा एक रिमोट प्रोग्राम आहे. इंटर्न कुठूनही यामध्ये सहभागी शकतात.
अर्ज प्रक्रियेमध्ये तीन टप्पे समाविष्ट आहेत- नोंदणी आणि स्क्रीनिंग, व्हिडिओ सबमिशन आणि वैयक्तिक मुलाखती. यामध्ये सहा ते दहा इंटर्नची निवड केली जाईल. त्यानंतर 30-60 दिवसांची ही इंटर्नशिप सुरु होईल. यामध्ये सहभागींना 1 लाख रुपये, प्रोडक्ट हॅम्पर्स, सोशल मीडिया फीचर्स आणि ब्रँड मार्केटिंगमध्ये प्री-प्लेसमेंट मुलाखतीसाठी संधी मिळतील. यामध्ये Deconstruct च्या त्वचारोग तज्ञांसह तज्ञांच्या नेतृत्वाखालील सत्रांचा देखील समावेश आहे, ज्यामुळे सहभागींचे स्किनकेअर ज्ञान वाढेल. (हेही वाचा; झोपेच्या कमतरतेमुळे होऊ शकता 'हे' गंभीर आजार; चांगल्या झोपेसाठी करा 'हे' उपाय)
Rs 1 Lakh Stipend For:
Rs 1 Lakh Stipend For #Skincare? This Unique #Internship Is Every Beauty Lover’s Dream!https://t.co/bmQbbeucKM
— ABP LIVE (@abplive) November 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)