भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी मुंबईतून मान्सूनने माघार घेतल्याची पुष्टी केली. गेल्या 72 तासांत शहर व उपनगरात पाऊस झालेला नाही, तर हवामान बहुतांश ठिकाणी दमट राहिले. विशेष म्हणजे, पुणे आणि नागपूर येथून एकाच दिवशी मान्सूनने माघार घेतल्याचे हवामान खात्याने सांगितले. सध्या दक्षिण कोकण, गोवा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मान्सूनला अनुकूल परिस्थिती आहे. उर्वरित प्रदेशांमध्ये सक्रीय असलेला मान्सून लवकरच माघार घेईल, अशी माहिती आयएमडीने दिली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रातील इतर भागात आणि तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील काही भागात माघार घेण्याची शक्यता आहे, असे त्यात म्हटले आहे.
या वर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्याने पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटत होता व त्यामुळे बीएमसीने 10% पाणी कपात केली होती. मात्र, जुलैमध्ये पावसाने जोर धरला आणि अखेर शहराला पाणीपुरवठा करणारे सात तलाव भरले. जुलै अखेरीस हंगामातील दोन तृतीयांश पावसाची नोंद झाली होती. (हेही वाचा: Dengue Outbreak In Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यू आजाराचा फैला, 15 दिवस शाळांना सुट्टी)
The Southwest Monsoon 2023 has withdrawn from some parts of Vidarbha, Maharashtra as on today 06th October 2023.
Conditions are becoming favorable for further withdrawal of Southwest Monsoon 2023 from remaining parts of Vidarbha during next 2-3 days. pic.twitter.com/m96fMDFY6M
— Regional Meteorological Centre, Nagpur (@imdnagpur) October 6, 2023
Southwest Monsoon has withdrawn from parts of Vidarbha, Marathwada, Madhya Maharashtra and Konkan (including Mumbai, Pune): IMD
This year, the withdrawal has been announced early. The usual date is October 10
h/t @richapintoi pic.twitter.com/ruaRPzpKO2
— Mumbai Lakes (@MumbaiLakes) October 7, 2023
Conditions are favorable for further withdrawal of Southwest Monsoon from remaining parts of East Uttar Pradesh, East Madhya Pradesh; some parts of Bihar, Jharkhand, Odisha, Chhattisgarh, Telangana; and some more parts of Maharashtra and Central Arabian Sea during next 2-3 days. pic.twitter.com/kRQnL7BjVJ
— India Meteorological Department (@Indiametdept) October 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)