महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाला आहे. जालना मध्ये मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यावेळी ते अन्न,पाणी वैद्यकीय मदतीशिवाय आंदोलन करणार आहेत. त्यांनी मराठा आंदोलकांना उग्रपणे आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. अशावेळी संभाजीनगर मध्ये एकजण 300 फूटावर मोबाईल टॉवर वर जाऊन आंदोलन करत आहे. सोशल मीडीयात त्याची क्लिप वायरल झाली आहे. 'जो पर्यंत मराठा आरक्षणाचा जीआर येत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं' तो म्हणाला आहे.
छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तरुणानं चक्क तीनशे फूट उचं मोबाईल टॉवरवर चढून उपोषणाला सुरुवात केली आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. pic.twitter.com/GGZG3hPsNq
— News18Lokmat (@News18lokmat) October 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)