Mumbai Traffic Police: लोकसभा निवडणूक(Lok Sabha Elction 2024)च्या पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी राज्यात १३ मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. मुंबईत १७ मे २०२४ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे महायुती (Mahayuti)कडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई ट्राफिक पोलिसांकडून काही बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी १० ते रात्री १२ दरम्यान करण्यात आलेल्या वाहतूक नियोजनाची नागरिकांनी नोंद घ्यावी. या बाबतची माहिती देणारे ट्विव ट्राफिक पोलिसांकडून करण्यात आले आहे. यात त्यांनी वाहनांच्या पार्किंगच्या उपाययोजनांची नोंद घेण्याचे मुंबईकरांना सांगितले आहे. (हेही वाचा:Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोमुळे मेट्रो प्रवाशांना सहन करावा लागला नाहक त्रास, घाटकोपर स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी )
१७ मे २०२४ रोजी शिवाजी पार्क, दादर येथे आयोजित 'जाहीर सभा' मध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
पश्चिम व पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी १० ते रात्री १२ दरम्यान करण्यात आलेल्या वाहतूक नियोजनाची नागरिकांनी नोंद घ्यावी. pic.twitter.com/L8saD9UYYR
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)