मकर संक्राती अगदी आठवड्यावर येवून ठेपली आहे. अगदी खमंग भाजणीच्या तिळाचा सुगंध, तिळगूळाचे लाडू, हलव्याचे दागिने आणि सगळ्यात उत्सहापूर्ण म्हणजे पतंगोत्सव. मकर संक्राती आली आणि पतंगचं नाही उडवली तर मकर संक्राती आल्याचा जराही भास होत नाही. या मकर संक्रांती निमित्त महावितरणा कडून राज्यातील जनतेला विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. तसेच दरम्यान साजऱ्या करण्यात येणार असलेल्या पतंगोत्सवाबाबत काही खास सुचना देखील देण्यात आल्या आहेत. पतंग विद्युत तारा असणाऱ्या परिसरा ऐवजी खुल्या मैदानात पतंग उडवण्यास सांगितलं आहे. तसेच तारेत अडकलेला मांजा न काढण्याचे किंवा स्पर्श देखील न करण्याच्या सुचना महावितरणा कडून देण्यात आल्या आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)