Maharashtra Vidhansabha Elections 2024 News18 Lokmat Exit Poll Results: निवडणूक प्रचाराच्या जोरदार फेरीनंतर, महाराष्ट्रात पुढील सरकार निवडण्यासाठी आज मतदान पार पडले. महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान झाले. सत्ता टिकवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीकडून परयत्न सुरु आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी सत्ताधारी सरकारला हटवण्यासाठी टक्कर देत आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, संपूर्ण राज्यात मतदान संपल्यानंतरच एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाऊ शकतात. पोलस्टर आणि मीडिया हाऊसेस 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून महाराष्ट्र राज्यासाठी त्यांची भविष्यवाणी प्रसारित करू शकतात. अशात आता राज्याचे लक्ष एक्झिट पोल आणि त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे. याआधी 2019 मध्ये, एक्झिट पोल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा अंदाज लावण्यात मोठ्या प्रमाणात बरोबर असल्याचे सिद्ध झाले. अशात तुम्ही संध्याकाळी साडेसहानंतर न्यूज18 लोकमत वाहिनीवर एक्झिट पोलचे निकाल पाहू शकता.

News18 Lokmat Exit Poll Results:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)