एकीकडे उत्तर भारतात हिवाळा सुरू झाला असताना दुसरीकडे दक्षिण भारतात पावसाने कहर केला आहे. हवामान खात्याने (IMD) अंदाज वर्तवला आहे की 1 डिसेंबरपर्यंत भारतातील 8 राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. भारतीय हवामान विभागाच्या मते, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये 1 डिसेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यातही 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यादरम्यान वारे जोरदार असण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व संलग्न मराठवाडा यामुळे प्रभावित होऊ शकतो, तसेच मुंबई ठाणे,पुणे सहीत. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)