राज्यामध्ये ऐन दिवाळीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडी (IMD) ने आज दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 1 नोव्हेंबर पासून पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, पुणेसहीत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात भावासाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये दोन नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत शेतीची कामं करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
1 नोव्हेंबर: 🌩🌩☔
IMD ने आज दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 1 नोव्हेंबर पासून पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.
द कोकण, पुणेसहीत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात ह्या दिवसात प्रभाव असेल.
- IMD pic.twitter.com/xDExONDPg7
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) November 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)