यंदाचा मान्सून पुढच्या अवघ्या चार दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढचे चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आज संध्याकाळी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. अहवालानुसार, येत्या 3-4 तासांत कोल्हापूर, सातारा, पुणे, बीड, सांगली, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, जालना या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह वादळासह ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे.
(हेही वाचा: Monsoon Update: मान्सून पुढच्या काहीच दिवसात केरळात, महाराष्ट्रात कधी? कसे असेल राज्यातील हवामान? घ्या जाणून)
Maharashtra | Thunderstorms accompanied by lightning and light to moderate spells of rain with gusty winds reaching 30-40 kmph are very likely to occur at isolated places in Kolhapur, Satara, Pune, Beed, Sangli, Latur, Osmanabad, Ahmednagar, Jalna during next 3-4 hours.
— ANI (@ANI) May 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)