महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उद्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्या लागणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी देखील याविषयी माहिती दिल्याचे लाईव्ह लॉने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ उद्या शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी निकाल देणार आहे. आमदार अपात्र ठरल्यास मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल, त्यामुळे सरकार पडेल व असे झाल्यास शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळू शकते.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 11 मे म्हणजेच गुरुवार हा दिवस निश्चित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयात निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. राज्यातील गेल्या वर्षीच्या राजकीय पेचप्रसंगाशी संबंधित उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांनी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी मार्चमध्ये आपला निर्णय राखून ठेवला होता. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड करणाऱ्या शिवसेनेच्या 16 आमदारांना (शिंदे गट) अपात्र करण्याच्या मागणीचा यामध्ये समावेश आहे. (हेही वाचा: Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी फडणवीस आशावादी, सरकारला धोका नसल्याचा व्यक्त केला विश्वास)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)