महाराष्ट्रात शिवसेनेतील आमदार फोडण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अडचणीत सापडलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपले सरकार वाचवण्यासाठी धडपडत आहेत. याआधी त्यांनी बंडखोर आमदारांशी संवाद साधण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक या दोन साथीदारांना सुरतला पाठवले होते. मात्र आता माहिती मिळत आहे की, त्यापैकी एक आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. रवींद्र फाटक, ज्यांना उद्धव ठाकरेंनी आपला निरोप घेऊन सुरतला बोलणी करण्यासाठी पाठवले होते तेच एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. फाटक यांच्यासोबत आणखी दोन आमदार संजय राठोड आणि दादाजी भुसे हेही गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. आता शिवसेनेचे 37 हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
#WATCH | Maharashtra Shiv Sena MLA Dadaji Bhuse, MLA Sanjay Rathod and MLC Ravindra Phatak with Eknath Shinde at Radisson Blu hotel in Guwahati. pic.twitter.com/nwGmY8Sr4E
— ANI (@ANI) June 23, 2022
Assam | More than 37 MLAs of Shiv Sena including Sanjay Rathod, Dadaji Bhuse are present with Eknath Shinde at the Guwahati's Radisson Blu Hotel: Sources
— ANI (@ANI) June 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)