महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमावाद सातत्याने वाढत आहे. मंगळवारी कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यात महाराष्ट्र नंबर प्लेट असलेली वाहने थांबवून त्यांना लक्ष्य करण्यात आले. कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आता सिंधुदुर्गात मनसे कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून घडलेल्या गोष्टीचा निषेध केला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध करण्यात आला. परिस्थिती सुधारली नाही तर कर्नाटकच्या बसेस जिल्ह्यात धावू देणार नाही, असे मनसेचे म्हणणे आहे. तसेच पुण्यातील मुंबई बंगलोर महामार्गावर कर्नाटकच्या दिशेने जाणारी बस रोखून मनसेने आंदोलन केले. कर्नाटकच्या बसेसला काळे फासण्यात आले.
पुण्यातील मुंबई बंगलोर महामार्गावर कर्नाटकच्या दिशेने जाणारी बस रोखून मनसेचे आंदोलन #pune #agitation #mns pic.twitter.com/PNUfd4sD0J
— Lokmat (@lokmat) December 6, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)